फार कमी लोकांना हे माहिती असतं की, रागाचं नियोजन करता येतं. ते केलं, तर त्यापायी होणारं नुकसान टाळता येऊ शकतं
राग या भावनेबाबत सर्वसामान्यपणे काही गैरसमज असतात. उदा., ‘माझा राग योग्यच असतो’, ‘मी काय उगाचच चिडचिड करत नाही’, ‘या लोकांमुळेच माझी तळपायाची आग मस्तकात जाते.’ म्हणजे भोवतालच्या घटना किंवा इतर लोक हेच आपल्या रागाला जबाबदार आहेत, असं अनेकांना वाटतं. हे घटक आपल्या रागाचे ‘ट्रिगर’ ठरू शकतात, पण पूर्णतः जबाबदार नसतात. कारण तसं असतं, तर प्रत्येकाचा रागाचा अनुभव समान पातळीवर असायला हवा, पण तसं नसतं.......